जाणून घ्या हिवाळ्यातील आहार आणि विहारहिवाळ्यातील आहार
या दिवसांमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपली भूक वाढलेली असते त्यामुळे खाल्लेले सर्व पदार्थ हिवाळ्यामध्ये पचतात. त्यामुळेच हिवाळा या ऋतू मध्ये शरीरात भरपूर भाज्या, फळे, ड्रायफूट तसेच जड अन्न खाऊन शरीरामध्ये ऊर्जा साठवून ठेवता येते, त्याचा उपयोग आपल्याला जेणेकरुन पूर्ण वर्षभर होतो.

गाजराचा हलवा, कडधान्य, टमाटर , कच्चे पदार्थ, आवळा अशी कमी पैशांमध्ये ही भरपूर ऊर्जा देणारे पदार्थ आपण हिवाळा ऋतू ऋतूंमध्ये खाऊ शकतो , गूळ सारखे उष्ण आणि तीळ सारखे तेलकट पदार्थही हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आहारात घ्यावेत.

या दिवसांमध्ये उडीद आणि सोयाबीन यांचा आहारात आवर्जून समावेश करावा.उडीद आणि सोयाबीन मुळे भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आणि पचनही त्रास होत नाही.
हिवाळ्यातील विहार
१) जास्तीत जास्त  गरम कपडे वापरावे
२) वार्‍यापासून जाताना कान टोपी चा वापर नक्की करावा
३) अभंग तेलाने मालिश करावी
४) अति गरम पाण्याने अंघोळ करू नये
५) गडद रंगाचे कपडे वापरावे
६) खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे
७) शरीर नेहमी स्वच्छ ठेवावे
८) हिवाळ्यात अती थंडीमुळे क्रॅम्प्स येण्याची शक्यता असते त्यामुळे सूर्यनमस्कार किंवा व्यायामाची इतर आसने झेपेल तेवढे करावेत.
९) थंडीच्या दिवसांमध्ये आपण बरेच वेळा एकाच ठिकाणी बसून वाचन, टीव्ही, मोबाईल ,कंप्यूटर बघत असतो, पण त्याच कारणाने आपल्याला जास्त थंडी वाजते, त्यामुळे त्या ऐवजी अधूनमधून कामात बदल करावा, कपाट लावणे, साफसफाई कशी काम केल्याने थोडा गरम पणा जाणवतो ,आणि थंडी कमी वाटते.

१०) जर तुम्ही जास्त वेळ झोपून आला तर थंडी जास्त जाणवते त्यामुळे हालचाल ठेवावी 

११) त्याचप्रमाणे अतिउत्साह आणि अचानक व्यायामास सुरुवात न करता , हळूहळू व्यायाम वाढवावा अशा सर्व प्रकारे हिवाळ्यामध्ये थंडीचा आनंद लुटताना शरीराला आणि मनाला प्रसन्न ठेवावे.

Post a Comment

0 Comments