मोदी सरकार देणार ४०००० रुपये मुलींच्या लग्नासाठी - मेसेज खरा की खोटाबरेच दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता "प्रधानमंत्री कन्या विवाह योजना"

आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून बऱ्याच घोषणा करण्यात आल्या होत्या.
कोरोना विषाणूचे संकट देशात आल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आखल्या होत्या.

"प्रधानमंत्री कन्या विवाह योजनेच्या" माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी 40 हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण पीआयबी फॅक्ट चेकने यांनी ट्विटरवर ट्विट करुन ही माहिती खोटी असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकार मुलींच्या लग्नासाठी पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचा स्पष्ट केला आहे. सध्या सरकारच्या  अशा कोणत्याही प्रकारच्या योजना नसल्याचे आणि घोषणा नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments