अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा - उद्यापासून होणार ऑनलाईन वर्ग चालू



४ आठवड्यांवर पडलेल्या मराठा आरक्षणामुळे, अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा केव्हा आणि कशी सुरू होईल , याविषयी शंका व्यक्त केली जात होती.

आता मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे  नुकसान होऊ नये म्हणून उद्यापासून म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा येत्या आठवड्यात सुरू करण्याचा विचार आहे अशी माहिती दिली.

ऑनलाइनच्या माध्यमातून विज्ञान, वाणिज्य, कला यात बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या चे वेळापत्रक म्हणजेच कोणत्या व्यासपीठावर कशा आणि किती वेळा साठी उपलब्ध होतील याची माहिती ही लवकरच देण्यात येईल. असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments