संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजय कुमार यांनी केली सैनिक शाळांसाठी 'ही' महत्वपूर्ण घोषणाआता इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण लागू होणार आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27 टक्के या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.२०२१-२२ या पुढील शैक्षणिक वर्षापासून सैनिक शाळांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे अशी संरक्षण मंत्रालयाचे सचिव अक्षय कुमार यांनी ही घोषणा केली.

 राज्य वा केंद्रशासित प्रदेशासाठी सैनिकांमध्ये  67 राखीव जागा असतात. परप्रांतातील विद्यार्थ्यांसाठी 33 टक्के जागा असतात याच आधारावर तयार केल्या जाणाऱ्या दोन्ही याद्यांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे असेही अजयकुमार यांनी सांगितले.
एकूण 33 सैनिक शाळा देशाभारत आहे. सैनिक स्कूल सोसायटी मार्फत आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत या शाळांचे कामकाज चालते.

 आरक्षण पुढील प्रमाणे असेल
15 टक्के अनुसूचित जातीसाठी 
7 टक्के अनुसूचित जमातीसाठी 
27 टक्के इतर मागास प्रवर्गासाठी 
13 टक्के संरक्षण प्रवर्गासाठी 
38 टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी

Post a Comment

0 Comments