पंतप्रधान मोदींनी दिली कोरोना प्रतिबंधक लसीकरण माहितीपंतप्रधान मोदींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतील कोरोना प्रतिबंधक लसी वर भाष्य केले आहे. संपूर्ण देशामध्ये अजूनही कोरोना विषाणू आहे. देशामध्ये अनेक प्रकारे प्रतिबंधक लसींचा चाचण्या सतत सुरूच आहेत आणि ज्यावेळेस कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल. तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
त्याच प्रमाणे कोरोना लसीचा प्रश्नांवर भाष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले, की प्रतिबंधक लस उपलब्ध होताच ती सर्व नागरिकांना देण्यात येईल, कोणालाही वगळण्यात येणार नाही. याची ग्वाही मी देशाला देतो.

केंद्र सरकारने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयामुळे आणि सर्व लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले. लॉक डाऊन  लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरू करण्याचा जो काही कालावधी होता तो पूर्णपणे योग्य असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच अद्यापही कोरोना संकट कायम आहे विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्व नागरिकांनी जागरूक असले पाहिजे. कोणताही हलगर्जीपणा न करता कुठे ही गर्दी करू नये. आणि या दिवसांमध्ये सावधान गिरी बाळगली पाहिजे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सध्या भारत सरकार कडून लस वितरणाची तयारी केली जात आहे संपूर्ण देशामध्ये ही लस येताच ती सर्व देशवासियांना देण्यात येईल. यासाठी सरकारने सुरुवातीला 50 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ही लस देण्यासाठी 385 रुपयापर्यंत खर्च होईल असेही सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments