नासाने केला चंद्राच्या पृष्ठभागावर 'हे' सापडल्याचा दावा



नासाच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार नासाने पत्रकार परिषदेत चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा केला आहे. नासाच्या सोफिया वेदशाळा द्वारे पहिल्यांदाच हे शोधले असल्याचे नासाने म्हटले आहे.

चंद्रावर पाणी सापडणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

या शोधातून चंद्रावर पाण्याचे अस्तित्व चंद्राच्या फक्त  ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशात पुरते मर्यादित नाहीत तर चंद्राच्या सूर्यप्रकाशित पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याची अंश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
अमेरिके अंतरिक्ष संस्था नासाने घेतलेल्या परिषदेत आपल्या या नव्या शोधा बाबतची माहिती दिली आहे त्याचबरोबर 2024 पर्यंत 2 अंतराळवीरांनाही चंद्र मोहिमेवर पाठवण्याचे त्याने निर्णय घेतला आहे.

2024 मध्ये जे2 अंतराळवीर चंद्रावर जातील त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल आणि त्यादृष्टीने शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नासाने या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पाण्याच्या अंश सहारा वाळवंटात असतील त्यापेक्षा शंभर पटीने कमी पाण्याच्या अंश  चंद्रावर असण्याची शक्यता आहे आणि अशाही स्थितीत पाण्याचा अंश  सापडणे ही शास्त्रज्ञांसाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. अशी नासाच्या परिषदेत माहिती देताना चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे हे सांगताना म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments