कोरोना चाचणीसाठी नवीन दर निश्चित - आरोग्य मंत्री राजेश टोपे4500 रुपयांवरून 980 रुपये पर्यंत इतके कमी दर निश्चित करून जनसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना चाचणीसाठी राज्यात खाजगी प्रयोगशाळेत प्रति तपासणी दर सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले असून नवीन दरानुसार चाचणीसाठी 980,1400 आणि 1800 असे दर खाजगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खाजगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही.
तीन टप्प्यांमध्ये कोरोना चाचणी चे दर निश्चित करण्यात आले. असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यास 980  कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा  करून तपासणी करण्यासाठी 1400 रुग्णाच्या घरी जाऊन संपली घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला निश्चित दिलासा मिळेल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील कोरणा चाचण्यांवर भर देण्यात असून प्रति दहा लाख लोकांमागे 70000 चाचण्या केल्या जात आहे आणि त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न चालू आहे जेणेकरून कोरूना वर अधिक नियंत्रण मिळवता येईल.

तसेच राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी. असे आव्हानही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments