पब्जी गेम भारतात पूर्णपणे बंदपब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट वर गेल्या महिन्यात सरकारने बंदी घातली होती तरीही ज्यांचे फोन आधीच पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट डाउनलोड केलेले आहेत. ते आरामात हे वापरू शकत होते. गेम खेळू शकत होते.

मात्र आता 30 ऑक्टोबर पासून भारतात कोणत्याही परिस्थितीत पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट वापरू शकणार नाही , ही माहिती स्वतः पब्जी इंडियाने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सर्व पब्जी वापरकर्त्यांना दिलेली आहे.
प्रिय फॅन्स पब्जी गेम 2 ऑक्टोबर 2020 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान च्या अंतरिम आदेशानंतर 30 ऑक्टोबर 20 रोजी आपल्या सेवा सर्व सेवा आणि भारतात प्रवेश बंद करणार आहे. आमची सर्वोच्च प्राथमिकता म्हणजे वापरकर्त्यांच्या डेटाचे सुरक्षा करणे हीच राहिली आहे. आम्ही नेहमीच डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. आम्हाला ही सेवा भारतात बंद करताना खूप वाईट वाटत आहे. तुम्हा सर्वांचे आभार. अशी पोस्ट पब्जी मोबाईल ने फेसबुक वर केलेली आहे.

तब्बल  2.48 लाख कोटी रुपयांचे भारतात पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट बंदीमुळे टेंन्संटला नुकसान झाले आहे. सन 2018 मध्ये भारतात पब्जी सुरू करण्यात आले होते आणि आता  २०२० मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. चालू झाले तेव्हापासून भारतातील वापरकर्त्यांची संख्या सर्वात जास्त होती. जगातील एकूण वापरकर्त्यांना पैकी 24% भारताचा वाटा होता.

Post a Comment

0 Comments