सोमवारी बंद राहील पुणे शहरातील पाणीपुरवठा



सोमवारी म्हणजेच दिनांक 2 नोव्हेंबरला. पुणे शहरातील काय काही भागातील पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी दिनांक तीन नोव्हेंबरला सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. अत्यावश्यक  दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा होणार नाही. असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्वती जलकेंद्र भाग- सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, तळजाई, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द
चतुःशृंगी वारजे जलकेंद्र परिसर - पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, चांदणी चौक, बाणेर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी.

भुगाव रस्ता परिसर लष्कर जलकेंद्र भाग- गोंधळेनगर, खराडी, सोलापूर रस्ता, सातववाडी, लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर नवीन होळकर आणि चिखली पंपिंग भाग- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी.

पुण्यातील या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Post a Comment

0 Comments