रोजच्या काही चांगल्या सवयीशमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
रोजच्या आहारामध्ये थोडाफार जरी बदल झाला तरी सर्व रुटीन बदलून जाते. जसे की अतिरिक्त साखर .अनावश्यक कर्बोदके. जास्त स्टार्च घातलेले पदार्थ यांचा आहारात प्रवेश झाला की मग हे पदार्थ आपल्या सवयीचे होऊन जातात आणि याच चुकीच्या सवयी वर मात करण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेणे फार आवश्यक ठरते.

पाणी -  शरीरातील तक्रारी टाळण्यासाठी ,दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
तेलकट बाहेरचे काही खाल्ले गेल्यास दोन ग्लास जास्त पाणी पिण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे,
घरचे जेवण - कामानिमित्त बाहेर पडले की बाहेरच्या खाद्य पदार्थांवर आपला जास्त हात असतो पण हेच तेलकट किंवा उघडे वगैरे ठेवलेले पदार्थ आपल्या आरोग्याला हानीकारक असतात. जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खावेत आणि निरोगी राहावे.

रोजच्या दगदगीच्या जीवनात बेतेल आणि झेपेल तितका व्यायाम आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वेळात वेळ काढून व्यायामाचा कोणताही प्रकार आत्मसात करावा.
व्यायाम हा आरोग्याला नवीन ऊर्जा देण्याचे तसेच ताजेतवाने ठेवण्याचे काम करत असतो.

झोप -  स्मार्टफोनच्या या जगामध्ये आपण रोज रात्री कळत-नकळत उशिरा झोपत असतो. हे सगळे आरोग्याला अतिशय घातक ठरते. त्यामुळे महत्वाचे सर्व काम उरकून नियमित झोपेची सवय करणे. खूप गरजेचे आहे. रोज नियमित सहा तास झोप घेणे हे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

Post a Comment

0 Comments