पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय 'परीक्षांसाठी बनणार आत्मनिर्भर'पुणे - SVNSMedia - भविष्यात ऑनलाइन परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता पुणे विद्यापीठाने परीक्षांसाठी अन्य कोणत्याही कंपन्यांवर अवलंबून न राहता आता स्वतःची यंत्रणा उभी करण्यात साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

>> अन्य कंपन्यांवर अवलंबून राहण्याचा निर्णय
>> स्वतःची परीक्षा यंत्रणा उभा करण्यासाठी पुढाकार
>> तांत्रिक अडचणींच्या प्रश्नांवर कायमचा तोडगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, सर्वच विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत, या परीक्षा ऑक्टोबर पर्यंत घेण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत.त्या कारणाने विद्यापीठांना कमी वेळेत ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विविध कंपनीची मदत घ्यावी लागली.

परीक्षा सुरू होऊन त्या अंतिम टप्प्यात येत आहेत मात्र कंपनीद्वारे होत असलेल्या परीक्षेत तांत्रिक अडचण यांच्या प्रश्न उभा झाला आहे. कारण सध्याच्या होणाऱ्या परीक्षेतील गोंधळ पाहता. जसे कि  गणित विषयातील आकृती प्रश्नसंच यात दिसून येत नव्हती. परीक्षांचे टायटल विषय एकसारखेच दिसतात. त्यामुळे परीक्षेत गोंधळ निर्माण होताना दिसतोय. हे सर्व गोंधळ टाळण्यासाठी, आता पुणे विद्यापीठाने स्वतःची सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

त्यामुळे प्राध्यापकांना तांत्रिक प्रशिक्षण देणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे परीक्षेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीत यादृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार आहे. त्याच प्रमाणे स्वतःची यंत्रणा असेल आणि ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या तर इतरांवर अवलंबून न राहता त्या अडचणी स्वतः दूर करणे शक्य होईल. अशी माहिती विद्यापीठाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments